बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण
योजना 2024 | Bandhkam Kamgar Kit
योजनेचे उद्दिष्ट आणि महत्व
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम क्षेत्रातील नोंदीत कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येते. या
योजनेचा उद्देश कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी भांडी आणि गृहपयोगी वस्तू पुरविणे हा आहे.
गृहपयोगी वस्तू संचातील सामग्री
बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना 2024 | Bandhkam Kamgar Kit
योजनेअंतर्गत वितरण करण्यात येणाऱ्या संचामध्ये एकूण 17 प्रकारच्या वस्तूंचा समावेश असून त्यांची यादी खाली दिली आहे:
गृहपयोगी वस्तू नग
ताट 04
वाटया 08
पाण्याचे ग्लास 04
पातेले झाकणासह 03
मोठा चमचा (भात वाटपासाठी) 01
मोठा चमचा (वरण वाटपासाठी) 01
पाण्याचा जग (2 लीटर) 01
मसाला डब्बा (7 भाग) 01
डब्बा झाकणासह (14 इंच) 01
डब्बा झाकणासह (16 इंच) 01
डब्बा झाकणासह (18 इंच) 01
परात 01
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) 01
कढई (स्टील) 01
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह 01
एकूण 30
योजनेचा लाभ का महत्त्वाचा?
बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना 2024 | Bandhkam Kamgar Kit
बांधकाम कामगारांना भांडी खरेदीसाठी आर्थिक भार पडू नये, या हेतूने ही योजना राबविण्यात येते. यामुळे कामगारांना खर्च वाचवता येतो आणि त्यांना दर्जेदार
भांडी मिळतात.
● अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
● अर्जदाराने महाराष्ट्रात 15 वर्षांचा वास्तव्य पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
● मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
● अर्जदार नोंदीत आणि सक्रिय कामगार असावा.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
● आधार कार्ड
● पॅन कार्ड
● रहिवाशी दाखला
● काम केलेल्याचे 90 दिवसांचे प्रमाणपत्र
● कायम पत्ता पुरावा
● ई-मेल आयडी
● मोबाइल नंबर
● बांधकामाचे स्थान व पत्ता
● नोंदणी अर्ज
● पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
● बँक पासबुक झेरॉक्स
● जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
● घोषणापत्र
अर्ज प्रक्रिया
कामगारांना दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करून संपूर्ण माहिती भरावी लागेल. आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित कामगार कार्यालयात अर्ज जमा
करावा.
योजना अंमलबजावणीची प्रक्रिया
● ई-निविदा पद्धतीने वस्तूंची निवड केली जाते.
● वस्तूंच्या दर्जाची तपासणी शासन मान्य प्रयोगशाळेतून केली जाते.
● गृहपयोगी वस्तूंवर मंडळाचे नाव कोरीव (Laser Engraving) असणे बंधनकारक आहे.
● वितरणाच्या वेळी लाभार्थ्यांचे छायाचित्र व बायोमेट्रिक माहिती घेतली जाते.
● जिल्हा कार्यालयांद्वारे वितरण शिबिरे आयोजित केली जातात.
वितरण संबंधित अटी व शर्ती
● अर्जदार कामगाराला या योजनेचा लाभ फक्त नोंदणी सक्रिय असल्यास मिळेल.
● जिल्हास्तरीय अधिकारी योजनेचे समन्वयक राहतील.
● सायकल योजनेसाठी देखील वेगळे अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेचा फायदा
या योजनेमुळे बांधकाम कामगारांना आर्थिक बचत होते. त्यांना आवश्यक भांडी मोफत मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते.
योजना खर्चाची तरतूद
या योजनेसाठी लागणारा खर्च महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील उपकर निधीतून भागविला जातो.
वितरण प्रक्रिया
बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना 2024 | Bandhkam Kamgar Kit
गृहपयोगी वस्तूंचे वितरण मंडळाच्या सूचनांनुसार वेळेत पूर्ण करण्यात येईल. तसेच वितरण कालावधी वाढविण्याचे अधिकार मंडळास राहतील.
योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर लाभार्थ्यांसाठी सुविधा व प्रक्रिया सुलभ ठेवण्याचे काम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ करत आहे.
Mahabocw Safety Kit Form Pdf
डाउनलोड
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
डाउनलोड
बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र